Monday, 20 May 2013

महात्मा फुले कृषि विद्यापीठ



महाराष्ट्र कृषि विद्यापीठ राहुरी येथे २९ मार्च १९६८ साली स्थापन करण्यात आले आणि महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव नंतर याला देण्यात आले. ऑक्टोबर १९६९ पासून कृषि विद्यापीठ कामकाज सुरु झाले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठ नगर - मनमाड रोड लगत अहमदनगर पासुन ३५ कि.मी. अंतरावर स्थित आहे, तसेच परिसरातील राहुरी स्टेशन पासुन १० कि.मी आणि मनमाड रेल्वे जंक्शन पासून ११० कि.मी. आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतीचे प्रगत शिक्षण देणे, संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण देणे या गोष्टीवर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पश्चिमी महाराष्ट्रातील दहा जिल्हे आहेत.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठात कॄषी आणि कृषी इंजीनियरिंग हे दोन भाग आहे. दोन्ही भागात स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कृषि विद्यापीठात माळी प्रशिक्षण, पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण असे इतरही प्रशिक्षण दिले जाते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अनुसंधान केद्रे हे वेगवेगळ्या जलवायु क्षेत्रात परलेले आहे. विद्यापीठातील २३ अनुसंधान स्टेशन, ४ राज्यस्तरिय विशेषज्ञ आणि १६ अनुसंधान केद्र हे चार वेगवेगळ्या कॄषी जलवायु क्षेत्रात स्थित आहेत.