१८०३ साली अहमदनगर किल्ला हा दिसायला आकाराने अंडाकृत असून किल्ल्याला एक मोठा (मुख्य) दरवाजा, चौविस बुरुज आणि तीन छोटे मार्ग आहेत. किल्ल्याच्या चहुबाजुंनी एक खंदक आहे जे १८ फुट रुंद, ९ फुटापर्यंत पाण्याने भरलेले (सध्या कोरडे) असे. किल्ल्याच्या बुरुज काळ्या पाषाणचे आणि काही ठिकाणी विटांच्या भिंती आहे. बुरुजाच्या भिंती केवळ ४॥ फुट उंच असून ते गोल आहे. त्यातील एका बुरुजावर पुर्वच्या दिशेने आठ बंदुका होत्या आणी बाकी बाजुनीं जंगल होते त्यामुळे त्यांवर बंदुका नाहीत. १८१३ साली प्रत्येक बुरुजावर दोन बंदुका ठेवण्यात आल्या आणि आक्रमण काळात २०० बंदुका तयार असत.
निजाम शाही राजवंशातील प्रथम सुलतान मलिक शाह अहमद याने १४२७ साली शेजारील शत्रुच्या आक्रमणापासुन शहरची रक्षा करण्यासाठी हा भुईकोट किल्ला बांधला. सुरुवातीला किल्ला मातीचा वापर करुन बनवण्यात आला होत परंतु नंतर १५५९ साली हुसैन निजाम शाहने मुख्य बुरुजाचे काम सुरु केले ते चार वर्षे चालले आणि १५६२ साली पुर्ण झाले. राजरानी चांदबीबी १५९६ सालचे मुगल आक्रमण यशस्वीरित्या परतवले परंतु १६०० साली अकबरने हा किल्ला जिंकला आणि तो मुगल साम्राजात शामिल करुन घेतला. औरंगजेबाचा वयाच्या ८८ व्या वर्षी किल्ल्यात २० फेब्रुवारी १७०७ ला मृत्यु झाला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर पेशव्यांनी मुगलांकडुन किल्ला विकत घेतला आणि मराठा सरदार शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला. मराठा साम्राजात माधरावांच्या मृत्यु नंतर आलेल्या अथ्तिरतेच्या काळात किल्ला दौलत शिंदे यांच्याकडे होता. १७९७ साली नाना फडणवीस येथे कैदेत होते.
दुसऱ्या एग्लो मराठा युध्दादरम्यान आर्थर वेलेसलेय याने मराठांचा युध्दात पराभव करून किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात घेतला. ब्रिटीश राजवटीत या किल्ल्याचा उपयोग कैद्याचे तुरंग म्हणुन केला जावु लागला.
येथे जवाहरलाल नेहरु, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल, डॉ. पी.सी. घोष आणि इतर कांग्रेस नेता येथे तीन वर्षे तुरुंगवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.
सध्या भुईकोट किल्ला भारतीय सैन्य दलाच्या स्वाधीन आहे