Wednesday, 15 May 2013

कळसुबाई शिखर



कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जिल्हातील अकोले तालुक्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत आहे. याचि उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आणि पादचारी रस्ते आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ कि. मी. असणाऱ्या बारी या गावापासून सुरु होतो.  नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी -भंडारदरा रस्त्याने गेल्यास  बारी हे गाव लागते. इगतपुरी मधुन पहाटे ५.०० वाजता बारी तसेच पुण्याच्या दिशेने वाहने जातात.

ह्या प्रवासाला तीन तासांचा अवधी लागतो. बारी गावातून थोडे अंतर गेल्यावर श्री हनुमानाचे मंदिर येते. या हनुमान मंदिरापाठीमागून  जाणाऱ्या मार्गाने यात्री शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरु होतो.
तेथे या रस्त्यावर तीन लोखंडी शिड्या आहेत त्यातील शेवट्च्या शिडी लगत एक विहीर आहे परंतु उन्हाळ्यात या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य नसते. बाकी उरलेल्या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यासाठी बारी गावातूनच पिण्याचे पाणी सोबत घेणे योग्य ठरेल. चढाईतील काही भाग वगळता बाकीचा रस्ता चढण्यास सोपा आहे.

शिखरावर तीन लोक एकावेळी बसु शकतील ऐवढे एक छोटे कळसुबाई देवीचे मंदिर आहे. शिखरावरुन भंडारदरा धरणातील पाण्याने व्यापलेला विस्तीर्ण भाग पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतो. शिखराच्या उत्तरेला रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत, पुर्वेला ऊंडा, विश्रामगड, बितनगड पश्चिमेला अलंग, मदनगड, रतडगड आणि दक्षिणेला पभारगड, घनचक्कर, हरिशचंद्रगड दिसतात