राळेगण सिद्धी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तलुक्यातील गाव आहे . हे गाव पुण्यापासून ८७ किलोमिटर स्थित असून गाव ९८२.३१ हेक्टर क्षेत्रात परलेले आहे. गाव पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रतिकृती म्हणून ओळखले जाते. गावात वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबलेले आहेत तसेच जामिनीचा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि पावसाचे पाण्याचा निचरा जमिनीत करण्यासाठी शेतांची शिडीदार रचना करण्यात आली आहे. गावात विजनिर्मिती साठी सौर उर्जी, बायोगॅस आणि पवनचक्की या नैसर्गिक उर्जा स्त्रोताचा वापर केला आहे. गावची सर्वात मोठी उपलब्धी तेथील गैर पंरपरागत ऊर्जा स्त्रोताचा वापर होय. उदाहरणार्थ, गावातील सर्व रस्तांवर बसवण्यात आलेले बल्ब हे वेगवेगळ्या सौर पैनलने चालतात.
गावचे सरपंच हेच ग्राम पंचायत अध्यक्ष आहेत. २००१ च्या जणगणेनुसार गावची लोकसंख्या २३०६ (पुरुष १२६५ आणि स्त्रींया १०४१ ) असून गावात ३९४ कुटुंब आहेत.
१९७५ साली गाव पाणी टंचाईने ग्रासलेला होता. गावात मोठ्या प्रमाणात गरीबी तसेच अवैध दारुचा व्यापार चालत असे. गावातील तटबंदी बांध त्यात पडलेल्या भेगांमुळे निकामी झाले होते. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी श्रमदान करुन बांध दुरुस्त करुन घेतले त्यामुळे एका उन्हाळ्यात गावातील सात विहीरींचे पाणी प्रथमच आपेक्षे पेक्षा जास्त होते.
आता गावात पाणी टंचाईची समस्या नाही तसेच गावात एक धान्य साठा, एक दुध केंद्र आणि एक शाळा आहे त्यामुळे गावात कोणीही दारिद्ररेषेखाली नाही.
ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, अण्णा हजारे यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. विश्व बैंकेने काढलेल्या एका निषर्कशात गावातील सहकार धोरणामुळे मागील २५ वर्षात स्थानिक अर्थव्यवथेत अमुलाग्र बदल घडुन आला आहे.
आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.