Sunday, 2 June 2013

हिवरे बाजार

गाव- हिवरे बाजार
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
तालुकाअहमदनगर
मुख्यालयनगर 

हिवरे बाजार हे गाव नगर तालुका अहमदनगर जिल्हा मधील आहे.
हिवरे बाजार हे गाव इतिहासात प्रसिद्ध होतं. हिवरेबाजारचे संदर्भ आपल्याला इतिहासातही सापडतात. पेशवेकालीन खाणाखुणा गावाने आजही जपल्यायत. पण त्याहीआधी गाव प्रसिद्ध होतं ते घोड्यांच्या बाजारासाठी. या गावाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होते. महाराजांच्या अखत्यारित असणाऱ्या जुन्नर परगाणा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव. गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा. घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची. शिवाय गावाला लागूनच निजामशाही साम्राज्य होतं. हिवरेबाजारात तेव्हा दूधदुभतं होतं. त्यामुळे इथे पट्टीचे पहेलवान तयार होऊ लागले.
१९७२ च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच गावातली मुख्य पिकं होती. ९५ टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. गावात पावसाचं प्रमाण २०० ते ४०० मि.मी होतं. गावातले लोक ४ महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. गावात सावकाराचं राज्य आलं. कालांतरानं दुधाची जागा दारुनं घेतली. दारुनं गावात धिंगाणा आणि मारामाऱ्या आणल्या. दारूमुळे गावात चोऱ्या होऊ लागल्या.
हिवरे बाजार हे गाव १९८९ पासुन सुधारण्यासाठी उभे राहीले. सरपंच पोपटराव पवार यांच्या सहभागामुळे यशस्वी झाला. ९० ते ९५ ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. पण गावाला हवी असलेली पिकं, पिण्यासाठी पाणी आणि शेतीतून रोजगार कुठून मिळणार? याला उत्तर होतं. जलसंधारण, मग जलसंधारणाचं नियोजन करून गावात पहिलं पाणी आणलं. समपातळी चर, कुरण विकास, रोजगारही मिळाला पाणीही मिळाले.
लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे बहुमोल कार्य करून, देशाच्या नकाशात आदर्श गावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला.